Ticker

https://www.jalgaonnews.com/feeds/posts/default?alt=rss

Ad Code

रविवारी मुंबई–नागपूर विशेष रेल्वेची एक फेरी; जळगाव, भुसावळसह १४ स्थानकांवर थांबे




प्रवाशांची वाढती गर्दी आणि अतिरिक्त मागणी लक्षात घेता मध्य रेल्वे प्रशासनाने मुंबई–नागपूर दरम्यान विशेष रेल्वेची एक अतिरिक्त फेरी चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या विशेष गाडीला जळगाव, भुसावळसह एकूण १४ स्थानकांवर थांबे देण्यात आले आहेत.

मुंबईहून रविवारी रात्री ८ वाजता नागपूरकडे ही विशेष गाडी रवाना होणार असून, दुसऱ्या दिवशी सकाळी ८.३० वाजता नागपूर येथे पोहोचणार आहे. परतीच्या प्रवासात नागपूरहून रात्री १२.२० वाजता सुटून दुसऱ्या दिवशी सकाळी ९.३० वाजता मुंबईत पोहोचणार आहे.

या विशेष गाडीत एसी, स्लीपर व जनरल डबे उपलब्ध असून, जळगाव, भुसावळ, अकोला, शेगाव, मलकापूर आदी स्थानकांवरील प्रवाशांना याचा लाभ होणार आहे. अतिरिक्त फेरीमुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या