Ticker

🔴 BREAKING NEWS
Loading...

Ad Code

Cyber Safety Students सायबर सुरक्षा जनजागृती अभियानाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; शेंदूर्णीतील दोन शाळांमध्ये मार्गदर्शन सत्र संपन्न



शेंदूर्णी | जळगाव न्यूज डिजिटल युगात वाढत्या सायबर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांमध्ये सायबर सुरक्षेबाबत जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने शेंदूर्णी येथील श्री कृष्ण माध्यमिक विद्यालय आणि शकुंतला जे. माध्यमिक विद्यालय येथे सायबर सुरक्षा जनजागृती विषयावर विशेष मार्गदर्शन सत्रांचे यशस्वी आयोजन करण्यात आले.

या सत्रांमध्ये प्रियदर्शनी भांडारकर आणि खुशबू लांबोळे यांनी विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षेच्या विविध पैलूंवर सविस्तर मार्गदर्शन केले. ऑनलाइन फसवणूक, फिशिंग, विशिंग, स्मिशिंग, ओटीपी व पासवर्ड सुरक्षितता, मजबूत पासवर्ड तयार करण्याचे महत्त्व, द्विस्तरीय प्रमाणीकरण (2FA), सोशल मीडियाचा सुरक्षित वापर, बनावट लिंक व क्यूआर कोड स्कॅम, सायबर बुलिंग, डिजिटल गोपनीयता, अज्ञात व्यक्तींशी ऑनलाइन संपर्क टाळणे, मोबाईल अॅप्स डाउनलोड करताना घ्यावयाची खबरदारी तसेच सायबर गुन्ह्यांपासून बचावाचे प्रभावी उपाय याबाबत विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली.

थेट तुमच्या व्हॉट्सअपवर मिळवा अपडेट...

https://whatsapp.com/channel/0029Vb68EiMJJhzR7qNXEn0F 

लिंकवर क्लिक करून फॉलो करा... 

श्री कृष्ण माध्यमिक विद्यालयात विशेष सत्र

दि. ३० जुलै २०२६ रोजी सकाळी ७.०० ते ८.०० या वेळेत पाचोरा रोड, शेंदूर्णी येथील श्री कृष्ण माध्यमिक विद्यालयात इयत्ता ८ वी ते १० वीच्या सुमारे २५० विद्यार्थ्यांसाठी हे मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात आले. विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेत विविध प्रश्न विचारले आणि सुरक्षित डिजिटल जीवनशैलीचा संकल्प केला.

या उपक्रमासाठी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. मीराबाई इंगळे, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

शकुंतला जे. माध्यमिक विद्यालयातही जनजागृती

दि. २७ जुलै २०२६ रोजी दुपारी ३.०० ते ४.०० या वेळेत शकुंतला जे. माध्यमिक विद्यालयात इयत्ता ५ वी ते १० वीच्या सुमारे २५० विद्यार्थ्यांसाठी सायबर सुरक्षा मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात आले.

या सत्रालाही विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विद्यार्थ्यांनी सायबर सुरक्षेबाबत प्रश्न विचारून शंका दूर केल्या तसेच जबाबदार डिजिटल नागरिक बनण्याचा संकल्प केला.

या कार्यक्रमासाठी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. राजेश्री महाजन, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.

सायबर सुरक्षा जनजागृती अभियानामुळे विद्यार्थ्यांमध्ये सुरक्षित इंटरनेट वापर, डिजिटल जबाबदारी आणि सायबर गुन्ह्यांविषयी सजगता निर्माण झाली असून अशा उपक्रमांची आजच्या काळात मोठी गरज असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

0