यावल | प्रतिनिधी यावल तालुक्यातील एका गावात १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर झालेल्या कथित लैंगिक अत्याचाराच्या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी यावल पोलिसांनी २२ वर्षीय संशयित आरोपीला ताब्यात घेतले असून त्याच्याविरुद्ध अपहरण, लैंगिक अत्याचार तसेच POCSO कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी सोमवारी रात्री घरी एकटी होती. त्यावेळी आरोपी साबीर उर्फ आसिफ गुलाब पिंजारी (वय २२, रा. दहिगाव, ता. यावल) याने तिला प्रलोभन दाखवून घराबाहेर बोलावल्याचा आरोप आहे. त्यानंतर गावातील स्मशानभूमी परिसरात नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची तक्रार नातेवाईकांनी पोलिसांकडे दिली आहे.
तक्रारीनुसार, मंगळवारी पहाटे आरोपीने मुलीला तिच्या घराजवळ सोडले. त्यानंतर नातेवाईकांनी विचारपूस केली असता मुलीने घडलेला प्रकार सांगितला. यानंतर कुटुंबीयांनी तातडीने यावल पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.
आरोपीविरुद्ध POCSO अंतर्गत गुन्हा
पीडितेच्या नातेवाईकांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध अपहरण, लैंगिक अत्याचार आणि लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण (POCSO) कायदा अंतर्गत गुन्हा नोंदविला आहे. संशयित आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून त्याची चौकशी सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
घटनेनंतर परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. काही स्थानिक नागरिक आणि संघटनांनी या प्रकरणात आरोपीवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. तसेच काही संघटनांनी या घटनेला "लव्ह जिहाद" असल्याचे आरोप केले आहेत.

0 टिप्पण्या