Translate

Ad Code

जळगाव हादरलं! रावेर-भुसावळमध्ये 'जिहादी' नेटवर्कचा शिरकाव? अल्पवयीन मुलांना फसवणाऱ्या पाकड्यांच्या गँगचं जाळं उघड!


जळगाव:
अहो जळगावकरांनो, सायलेंट मानल्या जाणाऱ्या आपल्या जळगाव जिल्ह्यात आता थेट पाकड्यांचे कनेक्शन समोर आलंय आणि तेही आपल्या पोरांच्या माध्यमातून! एटीएसने (ATS) केलेल्या कारवाईत रावेर, यावल आणि भुसावळ भागातील ८ अल्पवयीन पोरांना ताब्यात घेतल्याने अख्ख्या जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. हे पोरं पाकिस्तानातील कुख्यात गँगस्टर शहजाद भट्टीच्या संपर्कात होती, अशी माहिती समोर आली आहे.

काय आहे हे जिहादी प्रकरण? हे पोरं नुसती गँगस्टरच्या मागे लागली नव्हती, तर त्यांना 'जिहादी' नॅरेटिव्हच्या जाळ्यात ओढून देशविघातक विचारांकडे वळवण्याचा प्रयत्न होत होता. सोशल मीडियाच्या माध्यमातून ही पोरं कट्टरपंथी विचारांच्या प्रभावाखाली आली होती, अशी एटीएसला शंका आहे.

  • ब्रेनवॉशिंगचा खेळ: मोबाईलवर धार्मिक भावना भडकवणारे व्हिडिओ आणि जिहादी साहित्याचा वापर करून मुलांच्या डोक्यात विष कालवलं जात होतं.

  • स्लीपर सेलची भीती: ही पोरं उद्या भविष्यात देशविरोधी कारवायांसाठी 'स्लीपर सेल' म्हणून वापरली जातील की काय, अशी मोठी भीती आता सुरक्षा यंत्रणांना सतावतेय.

  • तीन महिन्यांची पाळत: हे काही एक-दोन दिवसांचं काम नव्हतं. आयबी (IB) आणि एटीएस गेल्या तीन महिन्यांपासून या मुलांच्या हालचालींवर बारीक नजर ठेवून होते. अखेर एटीएसने धाड टाकून या नेटवर्कची पोलखोल केली.

पालकांनो, आता तरी डोळे उघडा! एटीएसने पालकांना सक्त ताकीद दिली आहे. "तुमचा पोरगा मोबाईलवर काय बघतोय, रात्री कोणाशी चॅटिंग करतोय, हे आता नीट बघा. नाहीतर काळ सोकावलेला आहे, आज पोरगं चुकतंय आणि उद्या ते कोणत्या जिहादी जाळ्यात अडकेल, याचा नेम नाही."



तपास सुरुच आहे! सध्या जरी या पोरांना पालकांच्या स्वाधीन केलं असलं, तरी एटीएसचा तपास काही थांबलेला नाही. त्यांच्या मोबाईलमधील डेटा, बँक व्यवहार आणि इतर संशयास्पद हालचालींची कसून चौकशी सुरु आहे. जळगावसारख्या शांत भागात हे जिहादी जाळं किती खोलवर पसरलंय, याचा पर्दाफाश लवकरच होईल.

जळगावच्या मातीत अशा देशविरोधी आणि जिहादी विचारांना थारा नाही, पण हे जाळं वेळीच मोडून काढलं नाही तर पोरं बरबाद होतील, हेच खरं!


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या