Translate

Ad Code

जळगाव : विदगावजवळ तापी पुलावर धावत्या कारला भीषण आग; चालक, महिला आणि चिमुकली थोडक्यात बचावली

जळगाव तालुक्यातील विदगावजवळ तापी नदीच्या पुलावर धावत्या कारला अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली. कारमध्ये चालक, एक महिला आणि एक चिमुकली असल्याची प्राथमिक माहिती असून, प्रसंगावधान राखत सर्वांना वेळेत सुरक्षित बाहेर काढण्यात आले. त्यामुळे मोठी जीवितहानी टळली.




जळगाव | प्रतिनिधी जळगाव तालुक्यातील विदगावकडे जाणाऱ्या मार्गावरील तापी नदीच्या पुलावर गुरुवारी धावत्या कारला अचानक आग लागल्याने काही काळ परिसरात खळबळ उडाली.

प्राथमिक माहितीनुसार, कारमध्ये चालकासह एक महिला आणि एक चिमुकली प्रवास करत होते. कारमधून धूर आणि ज्वाळा बाहेर येत असल्याचे लक्षात येताच वाहन तातडीने थांबविण्यात आले. स्थानिक नागरिक आणि तेथून जाणाऱ्या वाहनचालकांनी तत्परता दाखवत कारमधील सर्वांना सुरक्षित बाहेर काढले.

या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी कारचे मोठे नुकसान झाल्याचे सांगितले जात आहे.



दरम्यान, या घटनेचा व्हिडिओ तेथून जाणाऱ्या वाहनचालकांनी आपल्या मोबाईलमध्ये चित्रीत करून Jalgaon News कडे पाठवला आहे. कारला आग नेमकी कशामुळे लागली, याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून अधिक माहितीची प्रतीक्षा आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या