ही कारवाई ब-हाणपूर–मुक्ताईनगर रस्त्यावरील पूर्णा नदी पुलाजवळ करण्यात आली. कारवाई दरम्यान टोयोटा इनोव्हा (MH 20 DF 5797) या वाहनातून गुटखा वाहतूक होत असल्याचं निदर्शनास आलं. FDA पथकाने पाठलाग करून वाहन थांबवले आणि तपासणी केली असता ८.१६ लाखांचा विमल पान मसाला व व्ही-१ तंबाखू, तसेच ६ लाखांचे वाहन असा एकूण १४.१६ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
👥 फरार आरोपी – तिघांविरोधात गुन्हा दाखल
या प्रकरणी मुक्ताईनगरचे बबलू कोळी, अनुपम गोसावी आणि मध्य प्रदेशच्या इच्छापूर येथील रईस (पूर्ण नाव अज्ञात) यांच्याविरोधात मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिघेही आरोपी सध्या फरार असून त्यांचा शोध सुरू आहे.
🕵️♂️ गोपनीय माहितीवरून कारवाई
अन्न व औषध प्रशासन विभागाच्या पथकाला गुप्त माहिती मिळाल्यानंतर ही योजना आखण्यात आली. ही कारवाई अन्नसुरक्षा अधिकारी अविनाश दाभाडे (नाशिक) आणि किशोर बाविस्कर (जळगाव) यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.
0 टिप्पण्या