Ad Code

Jamner News ‘जिल्हा परिषद आपल्या दारी’ उपक्रमात जामनेरात २५ तक्रारींवर तत्काळ कार्यवाही

 सीईओ मीनल करनवाल यांनी तक्रारदारांशी साधला थेट संवाद


जळगाव न्यूज  | जामनेर | जिल्हा परिषदेच्या ‘जिल्हा परिषद आपल्या दारी’ या उपक्रमांतर्गत जामनेर पंचायत समिती येथे गुरुवारी तालुकास्तरीय तक्रार निवारण सभा पार पडली. या बैठकीत २५ तक्रारी प्राप्त झाल्या असून, त्यावर मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी तक्रारदारांशी थेट संवाद साधत तातडीने कार्यवाही केली.

या उपक्रमामध्ये जिल्हा परिषदेचे विविध विभाग प्रमुख, अधिकाऱ्यांची प्रत्यक्ष उपस्थिती होती. तक्रारींचं स्थळीच निराकरण करण्यात आलं.

👥 उपस्थित अधिकारी:
अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी
ग्रा.वि. यंत्रणेचे प्रकल्प संचालक आर. एस. लोखंडे
उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्नेहा पवार व भाऊसाहेब अकलाडे
प्राथमिक शिक्षणाधिकारी विकास पाटील
माध्यमिक शिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण
अन्य संबंधित अधिकारी

🗣️ थेट संवादातून तत्काळ तोडगा
सीईओ मीनल करनवाल यांनी प्रत्येक तक्रारदाराशी थेट संवाद साधून त्यांच्या समस्या समजून घेतल्या. काही तक्रारींवर संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी तत्काळ कार्यवाही करून निवारण केले. या उपक्रमामुळे स्थानिक नागरिकांना प्रशासन जवळून अनुभवता आले.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या