जळगाव | प्रतिनिधी मध्य प्रदेशातील पावसाचा जोर कायम असल्याने हतनूर धरणातून तापी नदीत सोडण्यात येणाऱ्या पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आला आहे. त्यामुळे तापी नदीच्या पाणीपातळीत वाढ होत असून नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
रविवारी सकाळी शेळगाव बॅरेजमधून ५,७८४ क्युसेक वेगाने पाण्याचा प्रवाह सुरू असल्याची माहिती प्रशासनाने दिली. पावसाचा जोर कायम राहिल्यास धरणातून आणखी पाणी सोडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
प्रशासनाने नदीपात्रात किंवा काठावर अनावश्यक वावर टाळण्याचे आवाहन केले असून, मच्छीमार, शेतकरी आणि नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी, असे सांगितले आहे.
तसेच कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास स्थानिक प्रशासनाशी तातडीने संपर्क साधावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.
जळगाव जिल्ह्यातील माहिती आणि न्यूज थेट आपल्या व्हाट्सअपवर लिंक वर क्लिक करा

0 टिप्पण्या