Ticker

6/recent/ticker-posts

Translate

Ad Code

Jalgaon जिल्ह्यासाठी IMD कडून Red Alert; पुढील 24 ते 48 तास अतिवृष्टीचा इशारा





जळगाव | प्रतिनिधी भारतीय हवामान विभागाने (IMD) जळगाव जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी केला असून, पुढील 24 ते 48 तासांत अतिवृष्टी, जोरदार वारे, विजांचा कडकडाट तसेच काही भागांत पूरसदृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. त्यामुळे नागरिकांनी अत्यंत सतर्क राहण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार कमी वेळेत मोठ्या प्रमाणात पाऊस होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदी, नाले, धरण परिसर आणि सखल भागांमध्ये पाणी साचण्याचा तसेच पूरस्थिती निर्माण होण्याचा धोका आहे. शेतकरी, वाहनचालक आणि नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे प्रशासनाने म्हटले आहे.

नागरिकांनी या सूचनांचे पालन करावे

  • अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडणे टाळा.
  • नदी, नाले, पूल आणि पाण्याच्या प्रवाहाजवळ जाणे टाळा.
  • विजांचा कडकडाट सुरू असताना झाडाखाली किंवा मोकळ्या मैदानात उभे राहू नका.
  • मोबाईलवर हवामान विभाग आणि जिल्हा प्रशासनाच्या अधिकृत सूचना नियमित पाहा.
  • आपत्कालीन परिस्थितीत प्रशासनाशी तात्काळ संपर्क साधा.



आपत्कालीन मदतीसाठी संपर्क

टोल फ्री: 1077

जिल्हा आपत्कालीन नियंत्रण कक्ष:
0257-2217193
0257-2223180

WhatsApp हेल्पलाईन: 9373789064

प्रशासनाचे आवाहन

जिल्हा प्रशासनाने नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवता केवळ अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवण्याचे आवाहन केले आहे. विशेषतः पूरप्रवण भागातील नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी राहावे आणि कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास त्वरित नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा.


Jalgaon News, IMD Alert, Red Alert, Heavy Rain, Jalgaon Rain, Maharashtra Weather, Weather Update, Rain Alert, Monsoon, जळगाव, हवामान, अतिवृष्टी, रेड अलर्ट 




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

0