जामनेर | प्रतिनिधी लोकशाहीच्या इतिहासातील अत्यंत महत्त्वाच्या विषयावर जामनेर येथे विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. भारतीय जनता पक्ष, विधानसभा जामनेर क्षेत्राच्या वतीने ‘आणीबाणीची सत्यस्थिती’ या विषयावर व्याख्यान कार्यक्रमाचे आयोजन गुरुवार, २५ जून २०२६ रोजी करण्यात आले आहे.
या कार्यक्रमात सुप्रसिद्ध वक्ते, लेखक, इतिहास अभ्यासक आणि हिंदुत्ववादी कार्यकर्ते भरत अमदापूरे हे प्रमुख वक्ते म्हणून मार्गदर्शन करणार आहेत. लोकशाहीवरील आणीबाणीच्या काळातील घटनांचा सखोल आढावा, त्यामागील ऐतिहासिक पार्श्वभूमी आणि त्याचे दूरगामी परिणाम यावर ते भाष्य करणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.
Follow this link to join Jamner News WhatsApp group: https://chat.whatsapp.com/ElfOxLSrVBrLCUkvBNSU8a
कार्यक्रम सायंकाळी ६ वाजता जामनेर येथील एकलव्य विद्या मंदिर, छत्रपती शिवाजी महाराज नगर, जळगाव रोड येथे होणार आहे. लोकशाहीवरील आणीबाणीच्या काळातील सत्य घटनांचे वस्तुनिष्ठ विश्लेषण आणि ऐतिहासिक घडामोडींचा अभ्यास या व्याख्यानातून मांडला जाणार आहे.
भारतीय जनता पक्ष जामनेर विधानसभा क्षेत्राच्या वतीने आयोजित या कार्यक्रमास नागरिक, अभ्यासक, युवक आणि पक्ष कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
जाहिराती आणि बातमी साठी संपर्क - 7774943264

0 टिप्पण्या