Translate

Ad Code

"खरी शिवसेना एकनाथ शिंदे यांनी वाचवली; सहा खासदारांच्या प्रवेशाने ताकद वाढणार" – गुलाबराव पाटील

मुंबई / जळगाव | प्रतिनिधी : शिवसेनेच्या ६० व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात मंत्री गुलाबराव पाटील यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षावर जोरदार टीका करत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनाच बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची खरी वारसदार असल्याचा दावा केला.




भाषणाच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, महर्षी वाल्मिकी, संत रोहिदास आणि अहिल्याबाई होळकर यांना अभिवादन करून त्यांनी सर्व शिवसैनिकांना शिवसेनेच्या ६० व्या वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

गुलाबराव पाटील म्हणाले, "६० हा केवळ आकडा नाही, तर तो संघर्ष, निष्ठा आणि संस्कारांचा इतिहास आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसाच्या न्यायासाठी आणि हिंदुत्वाच्या रक्षणासाठी लावलेले छोटे रोपटे आज वटवृक्ष बनले आहे."

२०१९ नंतरच्या राजकीय घडामोडींवर भाष्य करताना त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली. "शिवसेनेने ज्यांच्याशी कधीही विचारांची तडजोड केली नाही, त्यांच्यासोबत सत्ता स्थापन करण्यात आली. त्यानंतर पक्षात असंतोष निर्माण झाला आणि आमदारांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली उठाव केला," असे ते म्हणाले.

गुवाहाटीतील बंडाचा उल्लेख करत त्यांनी सांगितले की, "एकनाथ शिंदे कोण आहेत, हे देश आणि जगाने पाहिले. त्यांच्या नेतृत्वामुळे शिवसेना वाचली आणि आज ती अधिक ताकदीने पुढे जात आहे."

यावेळी त्यांनी उबाठा नेत्यांच्या टीकेलाही प्रत्युत्तर देत, "आमच्यावर कितीही आरोप झाले तरी आम्ही बाळासाहेबांच्या विचारांशी प्रामाणिक राहिलो. सर्वसामान्य शिवसैनिकाला नेतृत्व देणारी हीच खरी शिवसेना आहे,"असे म्हटले.

गुलाबराव पाटील यांनी पुढे दावा केला की, "सहा खासदार शिवसेनेत प्रवेश करणार असून त्यामुळे पक्षाची ताकद आणखी वाढेल."

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या