Ticker

6/recent/ticker-posts

Translate

Ad Code

Muktainagar : छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर उत्साहात संपन्न; लाभार्थ्यांना मालकी हक्काचे पट्टे, प्रमाणपत्रे आणि ट्रॅक्टरचे वितरण




मुक्ताईनगर | जळगाव न्यूज प्रतिनिधी : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच दिवंगत उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त आयोजित 'छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर' मुक्ताईनगर येथे उत्साहात पार पडले. या शिबिराच्या माध्यमातून महसूल विभागाशी संबंधित विविध सेवांचा नागरिकांना एकाच ठिकाणी जलद, पारदर्शक आणि सुलभ पद्धतीने लाभ देण्यात आला.

शिबिरात महसूल विभागाशी संबंधित विविध दाखले, उत्पन्न, रहिवासी व इतर प्रमाणपत्रे, प्रलंबित महसुली प्रकरणे तसेच विविध सेवांचे तत्काळ निराकरण करण्यात आले. त्यामुळे नागरिकांना विविध शासकीय कार्यालयांच्या वारंवार फेऱ्या मारण्याची आवश्यकता भासली नाही.



यावेळी विविध शासकीय विभागांच्या माहिती व सेवा स्टॉलद्वारे नागरिकांना शासनाच्या विविध जनकल्याणकारी योजनांची सविस्तर माहिती देण्यात आली. पात्र लाभार्थ्यांना मालकी हक्काचे पट्टे, विविध प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. तसेच शेतकरी बांधवांना ट्रॅक्टरचे वाटप करून शासनाच्या कृषी योजनांचा प्रत्यक्ष लाभ देण्यात आला.

शासनाच्या सेवा प्रत्येक नागरिकापर्यंत वेळेत, पारदर्शक आणि प्रभावीपणे पोहोचाव्यात या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या महसूल समाधान शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.


या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी रोहन घुगे, मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांतभाऊ पाटील, विधानपरिषद आमदार नंदुभाऊ महाजन, उपविभागीय अधिकारी जितेंद्र पाटील, तहसीलदार वखारे, पोलीस उपाधीक्षक नंदराज पाटील, पोलीस निरीक्षक आशिष अडसूळ यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

0