🔴 BREAKING NEWS
Loading...

Ad Code

Yawal Police Station : यावलचे निरीक्षक प्रदीप ठाकूर यांची बदली; रंगनाथ धारबळे नव्या जबाबदारीत


यावल न्यूज : यावल पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप खंडू ठाकूर यांची प्रभारी जिल्हा पेठ, जळगाव येथे बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी शनीपेठ पोलीस स्टेशन, जळगावचे पोलीस निरीक्षक रंगनाथ त्र्यंबक धारबळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही बदल्यांची कार्यवाही जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या आदेशाने प्रशासकीय कारणास्तव करण्यात आली आहे.

प्रदीप ठाकूर यांनी यावल पोलीस ठाण्यावर मागील दीड वर्षांपासून कार्यरत राहून विविध गंभीर गुन्ह्यांवर कार्यवाही केली होती. स्थानिक गुन्हेगारी नियंत्रण, अवैध वाहतूक तसेच कायदा-सुव्यवस्थेच्या बाबतीत त्यांचे योगदान उल्लेखनीय मानले जाते.

दरम्यान, जिल्हाभरात कायदा-सुव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर एकूण १४ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये यावल पोलीस निरीक्षकपदाचीही नवीन नेमणूक झाली असून, रंगनाथ त्र्यंबक धारबळे यांच्यावर यावल पोलीस स्टेशनच्या प्रभारी पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

धारबळे यांना पोलीस खात्यात शिस्तप्रिय आणि कार्यक्षम अधिकारी म्हणून ओळखले जाते. शनीपेठ पोलीस ठाण्यात त्यांनी विविध गुन्ह्यांची तात्काळ तपासणी करत प्रभावी कारवाई केली होती. आता यावल परिसरातही कायदा आणि सुव्यवस्थेच्या अंमलबजावणीबाबत त्यांच्या कार्यशैलीकडून नागरिकांमध्ये सकारात्मक अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

यावल पोलीस ठाण्याच्या नव्या प्रभारी अधिकाऱ्यांमुळे स्थानिक गुन्हेगारी नियंत्रण, वाहतूक व शांतता राखण्यात अधिक गतिशीलता येईल, असे प्रशासन व नागरिकांतून बोलले जात आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

0