Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

Raver Accident News रावेरमध्ये भीषण अपघात: दुचाकीला आयशर ट्रकची जोरदार धडक; दोघांचा जागीच मृत्यू


रावेर न्यूज : जळगाव जिल्ह्यातील वाघोदा बुद्रुकजवळ दुर्दैवी अपघातात दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. रावेरकडे जाणाऱ्या रस्त्यावर पेट्रोल पंपाजवळ काल दुपारी दुचाकी आणि आयशर मालट्रक यांच्यात समोरासमोर धडक होऊन हा भीषण अपघात घडला.

अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे नितीन रामलाल कोळी (वय ४०, रा. मोहद, शहापूर) व नितीन धनराज कोळी (वय ३६, रा. रणगाव, रावेर) अशी आहेत. हे दोघे MH-19 DE 0168 क्रमांकाच्या दुचाकीवरून प्रवास करत होते.

या दरम्यान HR-55 WO 0360 क्रमांकाच्या आयशर मालवाहतूक ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक इतकी जबरदस्त होती की दोघांचाही मृत्यू घटनास्थळीच झाला.

अपघातानंतर ट्रकचालक शौकीन खान वहीद खान (रा. नवाबगड) याने घटनास्थळावरून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र सावदा पोलिसांनी तत्काळ कारवाई करत त्याला खानापूर बेरिअरवर अटक केली. संबंधित ट्रकही पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.

मृतदेहांना रावेर येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले असून, या प्रकरणाचा तपास एपीआय विशाल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सावदा पोलीस ठाण्याचे अधिकारी करत आहेत.

या दुर्दैवी घटनेने परिसरात शोककळा पसरली असून, नागरिकांत संतापाची लाट आहे. वाहनचालकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे आणि वाहन चालवताना अत्यंत दक्षता घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या