Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

Jalgaon Weather News जिल्ह्यात पुन्हा ढगाळ वातावरण, ४ जूनपासून अवकाळी पावसाची शक्यता


मान्सूनच्या आगमनाच्या आधीच उकाड्याचा त्रास; पेरणीची घाई टाळा – हवामान विभागाचा सल्ला

जळगाव हवामान अपडेट न्यूज 🌦️ : जळगाव जिल्ह्यात ३ ते ५ जून या कालावधीत ढगाळ वातावरणासह काही ठिकाणी दुपारनंतर अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

🔹 ३ जून रोजी आकाश ढगाळ राहील. पावसाची शक्यता फारशी नाही, मात्र दुपारनंतर तुरळक ठिकाणी हलका शिडकावा होऊ शकतो.
🔹 ४ जूनपासून हवामान अधिक ओलसर होण्याची चिन्हं असून, दुपारनंतर ५० ते ६०% शक्यतेने हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
🔹 या दरम्यान वाऱ्याचा वेग ३५ ते ४५ किमी/तास राहू शकतो.

भुसावळसह परिसरात उकाडा कायम
सध्या भुसावळ व परिसरात ढगाळ वातावरणामुळे तापमान सरासरी ३५ अंशांच्या आत आहे. सलग चौथ्या दिवशी तापमान कमी असले तरी, आर्द्रता वाढल्याने उकाडा जाणवत आहे.

१ ते ५ मे दरम्यान तापमान ४३ अंशांपर्यंत गेले होते. मात्र, ६ मेपासून झालेल्या अवकाळी पावसामुळे वातावरणात गारवा आला आहे.
मे महिन्यात एकूण ५ दिवस पावसाची नोंद झाली असून, २८ मे रोजी सर्वाधिक ९.४ मिमी पावसाची नोंद झाली.

 मान्सूनची झेप जवळ
हवामान विभागानुसार यंदा मान्सून ८ ते १० दिवस लवकर दाखल होण्याची शक्यता आहे.
पुणे आणि मुंबईमध्ये दाखल झाल्यानंतर, आता तो मराठवाडा आणि विदर्भात ही पोहोचला आहे. त्यामुळे खान्देशात देखील मान्सून लवकरच दाखल होईल, असा अंदाज हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी व्यक्त केला.

📌 महत्वाची सूचना (कृषी विभागाकडून):
जिल्ह्यात अजून जोरदार पावसाची सुरूवात झालेली नाही. त्यामुळे पेरणीची घाई करू नये, असा सल्ला शेतकऱ्यांना कृषी विभागाकडून देण्यात आला आहे.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या