📌 चंद्रकांत पाटील यांचा खडसे यांच्यावर सवाल:
"३४ एकर जमिनीतून १०० एकर कशी?"
आमदार चंद्रकांत पाटील यांनी थेट खडसे यांच्यावर हल्ला चढवत विचारले, "आपल्याकडे ३४ एकर जमीन होती, ती १०० एकर कशी झाली?"
कुरुंदकर प्रकरण
त्यांनी माजी पोलीस अधिकारी कुरुंदकर यांचा उल्लेख करत, "हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा अधिकारी एवढ्या उंचीवर कोणाच्या कृपेमुळे पोहोचला?" असा सवाल केला. तसेच, "माझ्याकडे कागदोपत्री पुरावे आहेत," असा दावाही केला.
👥 जळगाव न्यूज WhatsApp 📲 ग्रुपमध्ये सामील व्हा - https://chat.whatsapp.com/GPfOU1xWIscHfOTnpd7ouM
🛡️ एकनाथ खडसे यांचे प्रत्युत्तर:
"३४ नव्हे, माझ्या कुटुंबाकडे १२० एकर जमीन"
खडसे यांनी स्पष्टपणे सांगितले की, "माझ्या नावावर ३४ एकर जमीन आहे, पण कुटुंबासहित मिळून १२० एकर आहे. मी वयाच्या सातव्या वर्षीपासून शेतजमिनीचा मालक आहे."
"पन्नास खोके ओके" वरून टोला
खडसे यांनी पलटवार करत विचारले, "पोलिस हवालदाराचा मुलगा असलेल्या चंद्रकांत पाटील यांच्याकडे एवढी संपत्ती कशी? 'पन्नास खोके एकदम ओके'मधून आली का?"
तडीपाराचा संदर्भ
खडसे यांनी खुलासा केला की, "कुरुंदकर हेच आपल्या काळात पोलीस निरीक्षक होते, आणि त्यांनीच चंद्रकांत पाटील यांच्यावर तडीपार व ३०७ सारखे गुन्हे दाखल केले होते."
📣 प्रतिक्रिया व राजकीय पडसाद:
या आरोप-प्रत्यारोपामुळे मुक्ताईनगरच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. खडसे व महाजन यांच्यातील जुना संघर्ष माहीत असतानाच, आता शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटील यांचाही यात सहभाग वाढत आहे. राजकीय वर्तुळात हे आरोप पुढे कोणत्या दिशा घेतील, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
चंद्रकांत पाटील: खडसे यांच्यावर जमिनी संदर्भात गंभीर आरोप
खडसे: चंद्रकांत पाटील यांच्या संपत्तीचा व भूतकाळाचा उल्लेख करत पलटवार
कुरुंदकर प्रकरण व तडीपाराचे पुरातन आरोप पुन्हा चर्चेत
0 टिप्पण्या