Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

जळगाव – संभाजीनगर रस्त्यावर भीषण अपघात : टायर फुटल्यानंतर कारला अचानक आग, महिला जागीच जळून मृत


जळगाव–संभाजीनगर महामार्गावरील वाकोदगाव जवळील पिंपळगाव फाटा येथे रविवारी मध्यरात्री भीषण अपघाताची घटना घडली. एका कारचा टायर अचानक फुटल्याने वाहन अनियंत्रित झाले आणि काही क्षणातच कारला आग लागली. कारमधील चालकाला नागरिकांनी खिडकी तोडून बाहेर काढले, मात्र त्यावेळी घनदाट धुक्यामुळे कारमध्ये एक महिला असल्याचे दिसून आले नाही. चालकाला सुरक्षित ठिकाणी नेल्यानंतर त्याने सांगितले की कारमध्ये त्याच्यासोबत एक महिला सुद्धा होती.


हे समजताच स्थानिक ग्रामस्थ आणि सामाजिक कार्यकर्ते विशाल जोशी घटनास्थळी धावले. पहूर पोलीस, महामार्ग पोलीस, आरटीओ अधिकारी आणि वाकोदगावचे पोलीस पाटील यांनी बचावकार्य सुरू केले. मात्र तोपर्यंत कारमध्ये आग आणखीन भडकली होती आणि महिलेला बाहेर काढण्यापूर्वीच ती कारमध्ये जळून मृत झाली.

स्थानिकांनी तत्काळ ट्रॅक्टरच्या मदतीने आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. काही वेळानंतर जामनेर येथून अग्निशमन दलाची गाडी आणि कर्मचारी घटनास्थळी पोहोचले व त्यांनी आग विझवली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून महामार्ग काही काळासाठी वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला होता.

दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला असून, कारचे अवशेष जप्त करण्यात आले आहेत. या अपघातात नेमके कारण टायर फुटणेच होते की अन्य काही तांत्रिक कारण, याचा तपास पोलीस करत आहेत. जळगाव–संभाजीनगर महामार्गावरील ही दुर्दैवी दुर्घटना पुन्हा एकदा वाहनांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित करते.


#JalgaonNews #Jamner #Wakodgaon #PimpalgaonFata #JalgaonAccident #MaharashtraNews #CarFire #HighwayAccident #BreakingNews #JalgaonMirror #JalgaonCrime #FireIncident 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या