यावल – यावल येथील नगरपरिषदेचे पहिले लोकनियुक्त नगराध्यक्ष शशांक प्रभाकर देशपांडे (वय ७१) यांचे शनिवारी पहाटे सुमारे ४ वाजता अल्पशा आजाराने निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. प्रकृती खालावल्यामुळे त्यांना भुसावळ येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, जिथे त्यांचा मृत्यू झाला.
शशांक देशपांडे हे २००९ मध्ये यावल नगरपरिषदेमध्ये पहिले लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून निवडून आले होते. त्यांच्या कार्यकाळात यावल शहराच्या गंभीर पाणी पुरवठा समस्येवर यशस्वी तोडगा काढण्यात आला. नगरपरिषदेची नवीन, सुसज्ज इमारत देखील त्यांच्या काळातच बांधण्यात आली होती.
त्यांच्या पश्चात भाऊ, वहिनी, पुतण्या, पुतणी, आणि सुन असा परिवार आहे. ते डॉ. शंतनू देशपांडे यांचे काका होते.
दरम्यान, यावल शहरात साईबाबा मंदिर वर्धापन दिनानिमित्त महाप्रसाद व श्री साई भजन संध्या या कार्यक्रमांचे आयोजन केले होते, परंतु माजी नगराध्यक्ष शशांक देशपांडे यांच्या निधनामुळे हे कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.
0 टिप्पण्या