Translate

Ad Code

जळगाव पोलिसांची अमली पदार्थांविरोधात मोठी कारवाई; 1.86 कोटींचा 930.82 किलो गांजा कायदेशीर प्रक्रियेनंतर नष्ट



जळगाव | प्रतिनिधी जळगाव जिल्हा पोलिसांनी अमली पदार्थांविरोधातील कारवाईत आणखी एक महत्त्वाचे पाऊल उचलत विविध पोलीस ठाण्यांमध्ये जप्त करण्यात आलेला गांजा कायदेशीर प्रक्रियेनंतर नष्ट केला.

एनडीपीएस (Narcotic Drugs and Psychotropic Substances) कायद्यांतर्गत दाखल आठ गुन्ह्यांमधील 930.82 किलो गांजा, ज्याची अंदाजे किंमत 1,86,16,400 रुपये आहे, तो पोलिस मुख्यालयात नियुक्त समितीच्या उपस्थितीत नष्ट करण्यात आला.



पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील आठ पोलीस ठाण्यांच्या हद्दीत विविध कारवायांदरम्यान हा गांजा जप्त करण्यात आला होता. न्यायालयीन व इतर आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नियमानुसार त्याची विल्हेवाट लावण्यात आली.

यासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीत पोलीस विभाग, राज्य उत्पादन शुल्क (Excise) विभाग तसेच तहसील कार्यालयाचे अधिकारी सहभागी होते. सर्व संबंधित अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत संपूर्ण प्रक्रिया पार पडली.

अमली पदार्थांविरोधात 'झिरो टॉलरन्स'

यावेळी पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, महाराष्ट्रात अमली पदार्थांविरोधात 'झिरो टॉलरन्स' धोरण राबविले जात आहे. नुकतीच एमडी (MD) ड्रग्सविरोधात मोठी कारवाई करण्यात आली असून जिल्ह्यात कुठे गांजाची बेकायदेशीर लागवड होत आहे का, यावरही पोलिसांचे बारकाईने लक्ष आहे.

जळगाव जिल्ह्यातील माहिती आणि न्यूज थेट आपल्या व्हाट्सअपवर लिंक वर क्लिक करा

तसेच शाळा आणि महाविद्यालय परिसरात विशेष पाहणी सुरू असून, युवकांपर्यंत अमली पदार्थ पोहोचू नयेत यासाठी एनडीपीएस कायद्यांतर्गत कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचेही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

जळगाव पोलिसांची ही कारवाई समाजाला अमली पदार्थमुक्त करण्याच्या दिशेने महत्त्वाची मानली जात आहे.





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या