मालवाहू वाहनाला एसटीची जोरदार धडक; चालकाचा 'ब्रेक फेल'चा दावा, दोन जण जखमी
पारोळा | प्रतिनिधी जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यात रविवारी दुपारी झालेल्या भीषण रस्ते अपघातात १३ वर्षीय बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. भरधाव एसटी बसने पुढे जाणाऱ्या छोट्या मालवाहू वाहनाला मागून जोरदार धडक दिल्याने हा अपघात घडला. धडकेच्या जोरात बालक वाहनाबाहेर फेकले गेले आणि एसटी बसच्या चाकाखाली चिरडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, मालवाहू वाहन पारोळा येथून बाजार करून आपल्या गावाकडे जात असताना मागून आलेल्या एसटी बसने त्याला जोरदार धडक दिली. या अपघातात मालवाहू वाहनात प्रवास करणारे १३ वर्षीय बालक रस्त्यावर पडले आणि बसच्या चाकाखाली आल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. या भीषण अपघातात दोन दुचाकीस्वारही जखमी झाले असून त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
अपघातानंतर परिसरात मोठी गर्दी झाली. स्थानिक नागरिकांनी आणि पोलिसांनी तत्काळ मदतकार्य सुरू करत वाहतूक सुरळीत केली.
दरम्यान, एसटी बस चालकाने पोलिसांना दिलेल्या प्राथमिक माहितीत बसचे ब्रेक निकामी (ब्रेक फेल) झाल्यामुळे अपघात घडल्याचा दावा केला आहे. मात्र अपघाताचे नेमके कारण काय, याचा तपास पोलीस करत आहेत. बस चालकाला ताब्यात घेण्यात आले असून त्याच्याविरुद्ध पुढील कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू आहे.
या दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, रस्ते सुरक्षेचा आणि सार्वजनिक वाहतूक वाहनांच्या तांत्रिक तपासणीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
जळगाव जिल्ह्यातील माहिती आणि न्यूज थेट आपल्या व्हाट्सअपवर लिंक वर क्लिक करा

0 टिप्पण्या