Translate

Ad Code

राष्ट्रीय पिस्टल शूटिंगपटू सहीष्णा सोमवंशीचा जळगावात विशेष सन्मान; मराठा समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव


जळगाव | प्रतिनिधी 
जळगाव जिल्ह्यातील मराठा समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा रविवारी नूतन मराठा महाविद्यालयात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. दहावी-बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांसह स्पर्धा परीक्षा, क्रीडा आणि इतर क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा यावेळी सन्मान करण्यात आला.

या सोहळ्याचे प्रमुख आकर्षण ठरली राष्ट्रीय स्तरावरील पिस्टल शूटिंगपटू कु. सहीष्णा सचिन सोमवंशी. महाराष्ट्रासह देशासाठी राष्ट्रीय स्पर्धांमध्ये पदकांची कमाई करणाऱ्या सहीष्णाचा मान्यवरांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. तिच्या यशाबद्दल उपस्थितांनी कौतुक करत पुढील कारकिर्दीस शुभेच्छा दिल्या.

जळगाव जिल्ह्यातील माहिती आणि न्यूज थेट आपल्या व्हाट्सअपवर लिंक वर क्लिक करा 

कार्यक्रमाला डॉ. जालिंदर सुपेकर (विशेष पोलीस महानिरीक्षक तथा उपमहासमादेश्क, होमगार्ड, महाराष्ट्र राज्य), राजेश मोरे (मुख्य अभियंता, तापी पाटबंधारे विकास महामंडळ), डॉ. निलेश देविदास पाटील (प्राथमिक शिक्षणाधिकारी, जळगाव), कपिल जयकर पवार (उपसंचालक, आदिवासी विकास विभाग, नाशिक), निलेश रणजित भोंडे (सचिव, जि.जि.म.वि.प्र. सहकारी समाज) आणि अनिल तुकाराम पाटील (व्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र) यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत शिक्षणासोबतच क्रीडा, संशोधन, स्पर्धा परीक्षा आणि सामाजिक क्षेत्रातही उत्कृष्ट कामगिरी करण्याचे आवाहन केले. समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान हा इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत असल्याचे त्यांनी नमूद केले.

हा सन्मान सोहळा जि.जि.म.वि.प्र. सहकारी समाज, नूतन मराठा महाविद्यालय, मराठा सेवा संघ प्रणीत मराठा उद्योजक कक्ष, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाला विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या