#jalgaonnews
मुंबई | प्रतिनिधी बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार यांनी वनवासी कल्याण परिषदेच्या पुढाकारातून उभारल्या जाणाऱ्या जनजाती कन्या छात्रावासासाठी ₹१ कोटींचे आर्थिक सहकार्य दिले आहे. हा छात्रावास त्यांच्या मातोश्री श्रीमती अरुणा भाटिया यांच्या नावाने उभारण्यात येणार असून, एकावेळी ३० जनजाती विद्यार्थिनींना येथे निवासी सुविधा उपलब्ध होणार आहे.
यापूर्वीही अक्षय कुमार यांनी राजस्थानातील खेरवाडा (उदयपूर) येथे वनवासी कल्याण परिषदेच्या माध्यमातून जनजाती विद्यार्थ्यांसाठी छात्रावास उभारण्यासाठी ₹१ कोटींचे योगदान दिले होते. छात्रावास सुरू झाल्यानंतर त्यांनी विद्यार्थ्यांची भेट घेऊन संवादही साधला होता.
शिक्षणाच्या माध्यमातून जनजाती समाजातील मुलींना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी हा उपक्रम महत्त्वाचा मानला जात आहे. सामाजिक क्षेत्रातही अक्षय कुमार विविध उपक्रमांमध्ये सातत्याने योगदान देत असल्याचे यानिमित्त पुन्हा एकदा समोर आले आहे.


0 टिप्पण्या