Translate

Ad Code

जळगाव ते पंढरपूर ४८५ किमी सायकल वारी यशस्वी | ७५ सायकलिस्टांचा प्रेरणादायी प्रवास

जळगाव : जळगाव सायकलिस्ट ग्रुपच्या ७५ सदस्यांनी जळगाव ते पंढरपूर असा तब्बल ४८५ किलोमीटरचा सायकल प्रवास यशस्वीरीत्या पूर्ण करत विठ्ठल-रुक्मिणीच्या चरणी नतमस्तक होत भक्ती, आरोग्य आणि पर्यावरण संरक्षणाचा संदेश दिला.



सलग दुसऱ्या वर्षी आयोजित करण्यात आलेल्या या सायकल वारीत सहभागी सदस्यांनी अवघ्या तीन दिवसांत पंढरपूर गाठले. विठ्ठलाचे दर्शन घेतल्यानंतर जळगाव जिल्ह्याच्या सुख-समृद्धीसाठी, शेतकरी बांधवांच्या भरभराटीसाठी आणि स्वच्छ, सुंदर व हरित जळगावसाठी प्रार्थना करण्यात आली.

वारी पूर्ण झाल्यानंतर राज्याचे मंत्री गिरीष महाजन यांनी व्हिडिओ कॉलद्वारे सर्व सायकलिस्टांचे अभिनंदन करत त्यांच्या या उपक्रमाचे कौतुक केले.

ही सायकल वारी केवळ धार्मिक यात्रा नसून सुदृढ आरोग्य, पर्यावरण संवर्धन, इंधन बचत आणि सामाजिक जागृतीचा संदेश देणारी प्रेरणादायी लोकचळवळ असल्याचे सहभागी सदस्यांनी सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या