Translate

Ad Code

राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार २०२६ साठी अर्ज प्रक्रिया सुरू; पात्र शिक्षकांना संधी

जळगाव | प्रतिनिधी केंद्र सरकारच्या शिक्षण मंत्रालयामार्फत दिल्या जाणाऱ्या प्रतिष्ठित राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार-२०२६ साठी ऑनलाइन स्व-नामांकन प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. राज्यातील शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था तसेच मान्यताप्राप्त अनुदानित खासगी शाळांमधील पात्र शिक्षकांना या पुरस्कारासाठी अर्ज करता येणार आहे. पात्र शिक्षकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन शिक्षण संचालनालयाने केले आहे.


राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार हा देशातील शिक्षकांना दिला जाणारा सर्वोच्च सन्मान मानला जातो. शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या, नाविन्यपूर्ण उपक्रम राबविणाऱ्या तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य करणाऱ्या शिक्षकांच्या कार्याचा गौरव या पुरस्काराद्वारे केला जातो.

यावर्षीच्या पुरस्कारासाठी अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन पद्धतीने राबविण्यात येत आहे. राज्यातील शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था तसेच मान्यताप्राप्त अनुदानित खासगी प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांतील पात्र शिक्षकांना अर्ज करता येणार आहे.

इच्छुक शिक्षकांनी https://nationalawardstoteachers.education.gov.in या संकेतस्थळावर जाऊन स्व-नामांकनाद्वारे अर्ज सादर करावेत. अर्ज करण्याची अंतिम मुदत १० जुलै २०२६ निश्चित करण्यात आली आहे.

दरम्यान, अधिक माहितीसाठी शिक्षकांनी जिल्हा परिषद जळगाव येथील शिक्षणाधिकारी (प्राथमिक व माध्यमिक) कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

राष्ट्रीय स्तरावर शिक्षकांच्या कार्याचा गौरव करणाऱ्या या पुरस्कारासाठी जिल्ह्यातील जास्तीत जास्त पात्र शिक्षकांनी सहभाग नोंदवावा, असेही शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले आहे.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या