यावल तालुक्यातील किनगाव खुर्द गावात पोलिसांनी मोठी कारवाई करत 15 जणांना जुगार खेळताना रंगेहात पकडले आहे. ही कारवाई रविवार, 9 नोव्हेंबर रोजी रात्री 11.40 वाजता करण्यात आली. ही सर्व मंडळी गावातील पाण्याच्या टाकीखालील सार्वजनिक ठिकाणी जुगार खेळत असल्याची माहिती पोलिसांना मिळताच, तत्काळ पथकाने धडक देत छापा टाकला.
या कारवाईत पोलिसांनी जुगाराचे साहित्य व रोकड रक्कम मिळून 3,800 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणात दीपक भोई, शांताराम पाटील, सलीम मुसलमान शेख, जाबीर शिवाजी पाटील, नितीन वराडे, शशिकांत पाटील, भागवत पाटील, अंकुश कोळी, सुभाष महाजन, साहेबराव साळुंके, वासुदेव वराडे, रवींद्र पाटील, दिलीप वंजारी आणि सुनील पाटील या 15 जणांवर महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम कलम 12(अ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई यावल पोलिस ठाण्याच्या पथकाने केली असून, फिर्याद पोलीस हवलदार सचिन पाटील यांनी दिली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक रंगनाथ धारडे यांच्या मार्गदर्शनाखाली हवलदार संदीप सूर्यवंशी करीत आहेत.
पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, अशा बेकायदेशीर प्रकारांबाबत त्वरित पोलिसांना माहिती द्यावी आणि कायद्याची अंमलबजावणी करण्यात सहकार्य करावे.
#JalgaonNews #YawalPolice #GamblingRaid #KinagaonKhurd #CrimeNews
.png)
0 टिप्पण्या