Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

चाळीसगावमध्ये मंगेश चव्हाणांचा हा दावा तुम्हाला पटतोय का?

चाळीसगाव (Jalgaon News) | 9 नोव्हेंबर 2025

चाळीसगाव शहरात झालेल्या एका सभेत भाजप नेते मंगेश चव्हाण यांनी शहराच्या विकासाबाबत महत्त्वपूर्ण विधान केले आहे. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, “शहरातील विकासकामांचा वेग कायम ठेवायचा असेल तर आगामी नगरपालिकेच्या निवडणुकीत नगरपालिका भाजपच्या ताब्यात असणे अत्यंत गरजेचे आहे.”




मंगेश चव्हाण  म्हणाले की, प्रशासक असताना चाळीसगाव शहरात अनेक कोटी रुपयांची कामे मंजूर झाली. “प्रशासक असताना मी आमदार म्हणून जे प्रस्ताव दिले, ते तातडीने मंजूर झाले आणि शहरात मोठ्या प्रमाणावर विकासकामे झाली. पण आगामी काळात जर नगरपालिकेची स्वतंत्र निवडणूक झाली आणि ती भाजपच्या ताब्यात नसली, तर या कामांचा उपयोग होणार नाही,” असे ते म्हणाले.

स्थानिक स्वराज्य संस्थेला घटनेत स्वतंत्र अधिकार आहेत. कोणतेही विकासकाम मंजूर करायचे असल्यास नगरपालिकेच्या सभेत ठराव मंजूर होणे आवश्यक असते. “नगरपालिकेची बॉडी जर विरोधी पक्षाची असेल, तर ते प्रस्ताव मंजुरीसाठी पाठवणारच नाहीत. त्यामुळे वर कितीही पैसा आणला तरी तो वापरता येणार नाही,” असा दावा त्यांनी केला.

मंगेश चव्हाण यांनी आपल्या अनुभवाचा उल्लेख करत सांगितले की, “मी पहिल्यांदा आमदार असताना विरोधी पक्षाची नगरपालिका होती. अनेक विकास प्रस्तावांना विरोध झाला आणि काही कामांसाठी कोर्टापर्यंत जावे लागले. त्यामुळे मला समजले की, आमदार किंवा मंत्री असलो तरी, स्थानिक संस्था जर आपल्या पक्षाच्या ताब्यात नसेल, तर विकास शक्य नाही.”

भाजप सरकार सध्या राज्यात सत्तेत असल्याने, नगरपालिकेचे ठराव मंजूर करणे सोपे जाईल, असेही ते म्हणाले. “वर भाजपचे सरकार आहे. जर चाळीसगावची नगरपालिका भाजपच्या ताब्यात आली, तर आम्ही प्रस्ताव ताबडतोप मंजूर करून घेऊ. त्यानंतर ते कॅबिनेटमध्ये मांडून निधी मंजूर करण्यास विलंब होणार नाही,” असे मंगेश चव्हाण यांनी आश्वासन दिले.

शेवटी त्यांनी नागरिकांना आवाहन केले की, “चाळीसगावच्या विकासासाठी, आणलेला निधी योग्य रीतीने वापरण्यासाठी, आणि भविष्यात मोठी कामे सुरू ठेवण्यासाठी, नगरपालिकेत भाजपला बहुमत द्या. कारण कामांचा विनियोग फक्त सक्षम आणि सहकार्य करणारी बॉडीच करू शकते.”

मंगेश चव्हाणांच्या या वक्तव्यानंतर चाळीसगावच्या राजकारणात नवचैतन्य निर्माण झाले असून, स्थानिक स्वराज्य निवडणुकीसाठी राजकीय समीकरणे वेगाने बदलताना दिसत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या