जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते यांनी महायुतीसोबत येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकांमध्ये लढण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. त्यांनी सांगितले की, “महाराष्ट्रात महायुतीचं सरकार हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ताकदीमुळेच स्थापन झालं असून, आगामी निवडणुकांमध्येही महायुतीतूनच आपली वाटचाल राहील.”
स्थानिक स्तरावरचे निर्णय घेण्याचा अधिकार जिल्हा आणि तालुका अध्यक्षांना दिला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. काँग्रेस पक्षाबाबत टीका करताना ते म्हणाले, “काँग्रेस पक्ष आज बासनात गुंडाळलेला आहे, आणि जर त्यांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढवायचा निर्णय घेतला, तर तो पक्षाला समुद्रात बुडवण्यासारखं ठरेल.”
गुलाबराव पाटील यांच्या विधानाचा संदर्भ देत त्यांनी सांगितले की, “जळगाव जिल्ह्यात जर सन्मानपूर्वक जागा दिल्या गेल्या, तर आम्ही महायुतीसोबत जाण्यास तयार आहोत. कारण गेल्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी महायुतीच्या उमेदवारांना पाठिंबा दिला होता.”
अजित पवार यांच्यावर केलेल्या आरोपांबद्दल ते म्हणाले, “विरोधक केवळ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वाद निर्माण करतात. अजित दादांच्या आयुष्यात असे आरोप वेळोवेळी झाले, पण जनतेला आता वास्तव कळले आहे.” खडसे यांनी दिलेल्या राजीनाम्याबाबत त्यांनी प्रत्युत्तर देत म्हटले, “खडसे साहेबांचा सत्तेचा गैरवापर सर्वश्रुत होता, त्यामुळे त्यांना पक्षातूनच काढण्यात आले. पण अजित दादांचा प्रश्न वेगळा आहे-ते स्वच्छ प्रतिमेचे नेते आहेत.”
या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजकीय भूमिकेबाबत नव्याने चर्चा सुरू झाली असून, येणाऱ्या स्थानिक निवडणुकांसाठी महायुतीत स्थानिक पातळीवरील घडामोडींना वेग आला आहे.
#JalgaonNews #MaharashtraPolitics #NCP #AjitPawar #राष्ट्रवादीकाँग्रेस #महायुती #ChalisgaonPolitics #JalgaonPolitics #EknathKhadses #AjitDadaPawar #PoliticalNews #MaharashtraNews #Congress #भाजप #JalgaonBreakingNews
.png)
0 टिप्पण्या