Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

raver train stoppage केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांची रावेर रेल्वे थांब्यांसाठी रेल्वे बोर्डाला विनंती


रावेर स्थानकावर महत्त्वाच्या गाड्यांचे थांबे देण्याची केंद्रीय मंत्रींची मागणी

जळगाव — केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री रक्षा निखिल खडसे यांनी नुकताच रेल्वे बोर्डाचे चेअरमन सतीश कुमार यांची भेट घेत रावेर रेल्वे स्थानकावर काही महत्त्वाच्या गाड्यांचे थांबे देण्याची मागणी केली आहे. या बैठकीत रावेर व वरणगाव स्थानकांवर स्थानिक नागरिकांच्या वाढत्या मागणीनुसार गाड्यांचे थांबे देण्याबाबत सविस्तर चर्चा झाली.

खडसे यांनी प्रवाशांच्या सोयीसाठी आणि स्थानिकांच्या गरजेनुसार काही प्रमुख रेल्वेगाड्यांचे थांबे तात्काळ मंजूर करण्याची विनंती केली. या मागणीत पुढील गाड्यांचा समावेश आहे:

  • नवजीवन एक्सप्रेस (गाडी क्र. 12656) – बोदवड थांबा

  • दानापुर पुणे एक्सप्रेस (गाडी क्र. 12150) – रावेर थांबा (पुणे मार्ग)

  • महानगरी एक्सप्रेस (गाडी क्र. 22177) – रावेर थांबा

रावेर येथे या गाड्यांचे थांबे मिळाल्यास शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थी, शेतकरी, व्यापारी, नोकरदार, कामगार वर्ग तसेच सामान्य प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल, असा विश्वास रक्षा खडसे यांनी व्यक्त केला. या निर्णयामुळे परिसराचा सामाजिक तसेच आर्थिक विकास होण्यास मदत होईल, असेही त्यांनी नमूद केले.

रेल्वे बोर्डाचे चेअरमन सतीश कुमार यांनी या मागण्यांकडे सकारात्मकपणे लक्ष देण्याचे आश्वासन दिले असून, लवकरच यावर निर्णय घेण्यात येईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. या बैठकीस रेल्वे विभागाचे वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते.

रावेर-फैजपूर परिसरातील नागरिकांच्या दैनंदिन प्रवासासाठी आणि विकासासाठी हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.



👥 जळगाव न्यूज WhatsApp 📲 ग्रुपमध्ये सामील व्हा - 



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या