Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

mini tractor subsidy बचतगटांसाठी मिनी ट्रॅक्टर खरेदीवर ५०% अनुदान; अर्ज करायचे आवाहन

जळगाव — महाराष्ट्र शासनाच्या समाज कल्याण विभागांतर्गत अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या स्वयंसहाय्यता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर खरेदीसाठी ५०% अनुदान देण्याची योजना राबवली जात आहे. या योजनेचा उद्देश बचतगटांना आधुनिक कृषी उपकरणे मिळवून देऊन शेतकऱ्यांच्या कामाचा बोजा कमी करणे आणि आर्थिक विकासाला चालना देणे आहे.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या बचतगटातील किमान ८०% सदस्य अनुसूचित जाती किंवा नवबौद्ध घटकांचे असणे आवश्यक आहे. तसेच बचतगट महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असावेत. बचतगटांचे खाते राष्ट्रीयकृत बँकेत असणे अनिवार्य असून, गट विकास अधिकारी, कृषी अधिकारी किंवा प्रकल्प संचालक यांच्या कडे नोंदणीकृत असावेत.

मिनी ट्रॅक्टर खरेदीची कमाल मर्यादा ३,५०,००० रुपये आहे.

या योजनेत बचतगटांनी कमाल मर्यादेच्या १०% हिशेबाने स्वयंभू रक्कम भरल्यावर ते ५०% अनुदानासाठी पात्र ठरतील. जास्त अर्ज आल्यास बचतगटांची निवड लॉटरी पद्धतीने केली जाईल.

योजनेनुसार पहिला हप्ता मिनी ट्रॅक्टर आणि उपसाधनांची खरेदी केल्याची बिल पावती जमा केल्यावर दिला जातो. दुसरा हप्ता उप-प्रादेशिक परिवहन अधिकारी (आरटीओ) कडून नोंदणी प्रमाणपत्र सादर केल्यावर देण्यात येतो. अनुदान थेट बचतगटाच्या राष्ट्रीयकृत बँक खात्यावर जमा केला जाईल.

जिल्हा समाज कल्याण अधिकारी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, महात्मा रोड, मायादेव मंदिर समोर, जळगाव येथे या योजनेसंदर्भात अधिक माहिती व अर्जासाठी संपर्क साधता येईल. याबाबत सहायक आयुक्त योगेश पाटील यांनी बचतगटांना अर्ज करण्याचे आवाहन केले आहे.

मिनी ट्रॅक्टरसाठी ५०% अनुदान योजना अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या आर्थिक उन्नतीसाठी मोलाचा पाऊल असून, या योजनेंतर्गत अनेक बचतगटांना आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे या योजनेचा लाभ घेऊन शेतकरी बचतगट स्वावलंबी बनतील आणि उत्पादनक्षमता वाढेल.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या