जळगाव न्यूज | शिवसेना (ठाकरे गट) सोडून गेलेल्या आमदार गुलाबराव पाटील यांनी संजय राऊत यांच्यावर सडकून टीका करत त्यांना "शिवसेना डुबवणारे मशीन" असे संबोधले. "राऊत हे पांढऱ्या पायाचे, अभिनय करणारे आणि चापलुसी करणाऱ्यांना पुढे आणणारे नेते आहेत", अशी घणाघाती टीका त्यांनी केली.

💥 बडगुजर नाराजी, राऊतांवर ठपका
गुलाबराव पाटील म्हणाले:

“बडगुजर नाराजीचे मूळ कारण संजय राऊत आहेत. त्यांनी नेते, आमदार, खासदार गमावले, आता कार्यकर्तेही जात आहेत. कार्यकर्त्यांच्या मेहनतीकडे लक्षच नाही.”

🎭 "राऊत फक्त अभिनय करतात"
“संजय राऊत बाळासाहेबांसारखी अॅक्टिंग करतात, रुमाल खांद्यावर, हात गालावर... पण त्यांना पक्ष वाढवता येत नाही. फक्त कॉर्पोरेट राजकारणात गुंतले आहेत.”

🔥 "गिरीश महाजन दलाल? राऊत यांना बोलायची लायकी नाही"
गिरीश महाजन यांच्याबाबत संजय राऊतांनी केलेल्या दलाल वक्तव्यावर उत्तर देताना गुलाबराव पाटील म्हणाले:

“सात वेळा निवडून आलेल्या व्यक्तीला दलाल म्हणण्याची राऊतांची लायकी नाही. स्वतः कधीच निवडून आले नाहीत.”

📉 "शिवसेना गटात कार्यकर्ते राहिले नाहीत"
गुलाबराव पाटील यांनी म्हटलं:

“आम्ही २५ वर्षे पक्षात होतो. सुधाकर बडगुजर, त्यांच्या पत्नी यांचं योगदान मोठं आहे. हे कार्यकर्ते स्वार्थासाठी जात आहेत का?”

🔁 लक्ष्मण हाके प्रकरणावर प्रतिक्रिया
“SC/ST/OBC निधी वळवण्याचा अर्थ असा नाही की त्या खात्यावर पैसे येणार नाहीत. संसारासारखी अ‍ॅडजस्टमेंट आहे ही.”