पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास डीएनसी कॉलेजजवळील एका घरात वेश्याव्यवसाय सुरु असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर शनिपेठ पोलिसांनी पथकासह छापा टाकला. त्या वेळी घटनास्थळी जळगाव शहरातील दोन व जामनेर येथील एका महिलेची सुटका करण्यात आली.
या प्रकरणी अविनाश गोवर्धन रडे (वय ४७), शरद कौतिक कोळी (वय २५) आणि एक महिला यांच्याविरुद्ध अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक (PITA) कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रात्री उशीरापर्यंत पोलिस ठाण्यात या प्रकरणाची चौकशी सुरू होती.
याप्रकरणाचा पुढील तपास शनिपेठ पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक योगेश ढिकले करत असून, या प्रकरणात अजून कोणी सहभागी आहे का याची चौकशी सुरु आहे.
शहरात अशा प्रकारे घराच्या आडोशाने चालणाऱ्या अनैतिक व्यवसायांवर पोलिसांची कारवाई सुरू राहणार असल्याचे संकेत देण्यात आले आहेत.
0 टिप्पण्या