Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

Chalisgaon Police Crime: रक्षकच भक्षक! खंडणी प्रकरणात पोलिसांवर गुन्हा दाखल; आमदार मंगेश चव्हाण यांची कडक भूमिका


chalisgaon news चाळीसगाव न्यूज : शहरात कायदा व सुव्यवस्थेच्या रक्षक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पोलिसांपैकी काहींची खळबळजनक कारस्थानं समोर आली आहेत. शहरातील एका टायपिंग इन्स्टिट्यूटच्या मालकाकडे "३ लाख रुपये द्या, अन्यथा तुझ्यासह तुझ्या कुटुंबीयांना POSCO अंतर्गत गुन्ह्यात अडकवू" अशी धमकी देत चक्क १ लाख २० हजार रुपयांची खंडणी उकळल्याचा आरोप चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यातील काही कर्मचाऱ्यांवर करण्यात आला आहे.

सदर प्रकरणाची माहिती मिळताच आमदार मंगेश चव्हाण यांनी तात्काळ तक्रारदारासह शहर पोलीस ठाणे गाठले व तब्बल चार तास ठिय्या दिल्यानंतर संबंधित पोलीस कर्मचारी अजय पाटील व त्याच्या अन्य साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. यावेळी पोलीस कर्मचारी अजय पाटील यांच्या निवासस्थानी झडती घेतली असता खंडणी म्हणून घेतलेले संपूर्ण १ लाख २० हजार रुपये हस्तगत करण्यात आले.

आमदार मंगेश चव्हाण यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, "जे पोलिसांनी समाजातील अपप्रवृत्तीपासून नागरिकांचं रक्षण करायचं, तेच जर भक्षक बनून सर्वसामान्यांना वेठीस धरू लागले तर अशा प्रवृत्तीचा तीव्र निषेध करणे आवश्यक आहे. मी या प्रकरणी राज्याचे मुख्यमंत्री, पोलीस महासंचालक आणि विशेष पोलिस महानिरीक्षक यांच्याकडे लेखी तक्रार करणार असून, संबंधित सर्व आरोपी पोलिसांची चौकशी IPS दर्जाच्या अधिकाऱ्यांकडून व्हावी यासाठी मागणी करणार आहे."

📢 ताज्या आणि जळगाव जिल्ह्यातील थेट बातम्यांसाठी WhatsApp ग्रुपला मिळवा जॉइन करा: - https://chat.whatsapp.com/GPfOU1xWIscHfOTnpd7ouM

ते पुढे म्हणाले, "मी आमदारकीच्या पहिल्याच दिवसापासून अशा अन्यायाविरोधात लढत आलो आहे. कोणतीही व्यक्ती मोठी असो वा जवळची, जर ती चुकत असेल तर तिच्यावर कारवाई झालीच पाहिजे. पीडित नागरिकांना न्याय मिळावा, हा माझा कटाक्ष आहे."

शेवटी आमदार चव्हाण यांनी चाळीसगावकरांना आवाहन केले की, "शासन किंवा प्रशासनातील कुणीही अन्याय करत असेल, पैशांची मागणी करत असेल तर थेट माझ्याशी संपर्क साधा. मी तुमच्या पाठीशी ठामपणे उभा आहे."

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या