Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

11th Admission : ११वी प्रवेश प्रक्रियेला सुरुवातीलाच ब्रेक! संकेतस्थळावर एरर, नोंदणी २१ मेपासून



जळगाव न्यूज : राज्य शासनाच्या ११वी प्रवेश प्रक्रियेला सुरुवातीलाच तांत्रिक अडथळ्यांमुळे मोठा फटका बसला आहे. चार महिन्यांपासून ऑनलाइन प्रवेशासाठी योजना जाहीर करूनही सोमवारी सुरुवातीच्या दिवशी संकेतस्थळावर 11thadmission.org.in एररची सूचना झळकत राहिल्याने एकही विद्यार्थ्याची नोंदणी होऊ शकली नाही. या प्रकारामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये मोठा गोंधळ निर्माण झाला.

सुरुवातीला १९ मेपासून नोंदणी प्रक्रिया सुरु होणार होती, त्याआधी दोन दिवस म्हणजे १९ आणि २० मे हे सराव सत्र म्हणून ठेवण्यात आले. मात्र "551 handshake failed" अशी तांत्रिक एरर सतत झळकत राहिल्याने हे संकेतस्थळ पूर्णपणे ठप्प झाले. या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाने तातडीने वेळापत्रकात बदल करत २१ मेपासून प्रत्यक्ष नोंदणी प्रक्रिया सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.

  • नवीन वेळापत्रकानुसार:
  • २१ ते २८ मे: विद्यार्थी प्रवेश अर्जासह महाविद्यालय पसंतीक्रम भरू शकतील.

  • ३० मे: तात्पूर्ती गुणवत्ता यादी जाहीर होणार.

  • १ जून: हरकती आणि दुरुस्ती करण्याची अंतिम मुदत.

  • ३ जून: अंतिम गुणवत्ता यादी जाहीर केली जाणार.

शिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण यांनी स्पष्ट केले की, संकेतस्थळ सुरु न होण्यामागे राज्यस्तरावर तांत्रिक काम सुरू असल्याचे कारण आहे. विद्यार्थ्यांसाठी जिल्हास्तरीय मदत केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत आणि तांत्रिक अडचणी दूर करत प्रवेश प्रक्रिया सुरळीत राबवण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

📢 ताज्या आणि जळगाव जिल्ह्यातील थेट बातम्यांसाठी WhatsApp ग्रुपला मिळवा जॉइन करा: - https://chat.whatsapp.com/GPfOU1xWIscHfOTnpd7ouM

दरम्यान, विद्यार्थ्यांना केवळ १० पर्यंतच कनिष्ठ महाविद्यालयांचे पसंतीक्रम भरता येणार असून, ही मर्यादा बदलण्याची सध्या शक्यता नाही. ऑनलाइन प्रणालीत सुधारणा आणि सर्व विद्यार्थ्यांना समान संधी देण्यासाठी राज्य शिक्षण विभाग प्रयत्नशील असल्याचा दावा अधिकाऱ्यांनी केला आहे.

ऑनलाइन प्रक्रियेला झालेल्या या सुरुवातीच्या अपयशामुळे विद्यार्थ्यांचे मानसिक तनाव वाढला असून पालकांनी यंत्रणेकडून ठोस उपाययोजना आणि तत्काळ सेवा सुरळीत करण्याची मागणी केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या