BODWAD BJP NEWSबोदवड :- येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली केंद्र सरकारने घेतलेल्या ऐतिहासिक आणि धाडसी निर्णयाचे जोरदार स्वागत करण्यात आले. केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतलेल्या जातीनिहाय जनगणना करण्याच्या निर्णयामुळे देशातील वंचित आणि मागासवर्गीय समाज घटकांना आपला हक्क मिळवून देण्यात मदत होणार असून, यामुळे देशाची सामाजिक व आर्थिक समतोल अधिक सक्षम होईल, असे मत स्थानिक भाजप नेत्यांनी व्यक्त केले.
या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर बोदवड शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर भाजपच्या वतीने फटाके फोडून, पेढे वाटून आणि घोषणाबाजी करत आनंदोत्सव साजरा करण्यात आला. उपस्थित कार्यकर्त्यांनी "मोदी सरकारचा विजय असो" अशा घोषणा देत केंद्र सरकारचे आभार मानले.
यावेळी तालुकाध्यक्ष अमोल देशमुख, माजी तालुकाध्यक्ष मधुकर राणे, जिल्हा उपाध्यक्ष प्रभाकर पाटील, नगराध्यक्ष आनंदा पाटील, तसेच जिल्हा सरचिटणीस वैशाली कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते. नेत्यांनी संयुक्तपणे सांगितले की, जातीनिहाय जनगणना केल्यास समाजाच्या विविध स्तरांबाबत अचूक माहिती उपलब्ध होईल, जी भविष्यात धोरणात्मक निर्णय घेताना उपयोगी ठरेल.
भाजपने घेतलेल्या या उपक्रमामुळे स्थानिक स्तरावर नागरिकांमध्येही उत्साहाचे वातावरण होते. समाजहितासाठी घेतलेल्या या ऐतिहासिक निर्णयाचे सर्व स्तरांवरून स्वागत होत असून, यामुळे सामाजिक न्यायाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकले गेले आहे, असे मत उपस्थितांनी व्यक्त केले.
0 टिप्पण्या