महेंद्र मराठे हे आपल्या पत्नी गायत्री (वय ३५) व मुलगी हर्षिता (वय १३), मुलगा काव्यांश (वय ३) यांच्यासह जळगावातील शिव अपार्टमेंट, प्रज्ञा कॉलनी येथे राहतात. शनिवार, १० मे रोजी सायंकाळी पाच वाजता गायत्रीने आपल्या मुलांना बागेत नेतो असे सांगितले. मात्र त्यानंतर ती घरी परतली नाही. पती महेंद्र यांनी अनेक ठिकाणी शोध घेतला; नातेवाईक, परिचित यांच्याशी संपर्क साधला, परंतु काहीही माहिती मिळाली नाही. अखेर त्यांनी तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दिली.
गायत्रीचे वर्णन पुढीलप्रमाणे: वय ३५ वर्षे, उंची १६६ सेमी, मध्यम शरीरयष्टी, रंग गोरा, अंगात पिवळ्या रंगाची साडी. तिची मुलगी हर्षिता – वय १३, सडपातळ शरीरयष्टी, ४ फूट उंची, अंगात काळा टी-शर्ट आणि काळी जीन्स. मुलगा काव्यांश – वय ३, गोरा वर्ण, उंची ३ फूट, अंगात गुलाबी रंगाचा नेहरू कुर्ता व गुलाबी पायजमा.
या घटनेमुळे परिसरात चिंता आणि चर्चेला उधाण आले आहे. पोलिसांनी अपहरणाची शक्यता नाकारलेली नसून, सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत. गायत्री व तिच्या मुलांचा शोध घेण्यासाठी विशेष पथक तयार करण्यात आले असून, स्थानिकांनाही काही माहिती असल्यास पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
0 टिप्पण्या