Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

POLITCAL NEWS संजय राऊत यांच्या ‘नरकातला स्वर्ग’ पुस्तकाचे प्रकाशन १७ मे रोजी

मुंबई – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार आणि ‘सामना’चे कार्यकारी संपादक संजय राऊत यांच्या ‘नरकातला स्वर्ग’ या पुस्तकाचे प्रकाशन १७ मे २०२५ रोजी होणार आहे. रवींद्र नाट्यमंदिर, मुंबई येथे आयोजित या कार्यक्रमात सुप्रसिद्ध गीतकार आणि पटकथालेखक जावेद अख्तर यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन होईल.






या प्रकाशन सोहळ्याला शिवसेना (उबठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) अध्यक्ष शरदचंद्र पवार हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.


संजय राऊत यांनी अलीकडेच फेसबुक पोस्टद्वारे या प्रकाशन सोहळ्याची माहिती दिली. या पुस्तकात त्यांनी ईडीच्या चौकशीदरम्यानचे अनुभव, तुरुंगातील १०० दिवस, आणि त्यामागचा राजकीय व वैयक्तिक संघर्ष कथन केला आहे.

राजकीय वर्तुळात या पुस्तकात ईडीसह इतर तपास यंत्रणांच्या कार्यप्रणालीवर गंभीर प्रश्न उपस्थित केले जाणार असल्याची चर्चा आहे. संजय राऊत यांनी तुरुंगात असताना लिहिलेल्या लेखनाचा हा दस्तावेज म्हणून ‘नरकातला स्वर्ग’ महत्त्वपूर्ण मानले जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या