गायत्री कोळी (वय २६) या विवाहितेचा मृतदेह गुरुवारी गळफास लावलेल्या अवस्थेत आढळून आला. प्रारंभी ही आत्महत्या असल्याचं सांगितलं जात होतं. मात्र, तिच्या माहेरच्या नातेवाईकांनी सासू आणि नणंदेने मिळून हत्या केल्याचा आरोप करत प्रकरणाला नवं वळण दिलं आहे.
गायत्री ही पती, दोन मुले, सासू आणि नणंदेसह गावात राहत होती. तिचा पती भाजी विक्री करत असून ती शिवणकाम करून घराला हातभार लावत होती. गायत्रीच्या मासिक पाळीच्या काळात स्वयंपाक केल्यावरून घरात वाद झाला, आणि त्याच वादातून तिची गळा आवळून हत्या करण्यात आली, असा आरोप तिचा भाऊ सागर कोळी याने केला आहे.
सागर कोळीच्या मते, हत्या करून तिला आत्महत्येसारखा देखावा देण्यासाठी मृतदेह गळफास लावून लटकवण्यात आला. या घटनेनंतर गायत्रीचा पती, सासू आणि नणंद फरार झाले आहेत. त्यामुळे संशय अधिकच बळावला आहे.
गायत्रीच्या नातेवाईकांनी पोलिसांकडे ठाम मागणी केली की, जबाबदार व्यक्तींवर गुन्हा दाखल न होईपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाहीत. सध्या पोलीस तपास सुरू असून, या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात संतापाची लाट पसरली आहे.
0 टिप्पण्या