Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

NASHIRABAD NEWS फक्त तीन महिन्यांत विवाहितेचा छळ; सासरच्या आठ जणांवर गुन्हा दाखल



नशिराबाद (ता. जळगाव) येथील एका अवघ्या २० वर्षीय विवाहितेचा केवळ तीन महिन्यांतच सासरच्या मंडळींकडून मानसिक व शारीरिक छळ झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुंबईत सासरी असताना शिवीगाळ, मारहाण आणि सततच्या मानसिक छळामुळे त्रस्त झालेल्या विवाहितेने अखेर पोलिसात धाव घेत गुन्हा दाखल केला आहे.

पीडित महिला प्रियंका शिवा खरात (वय २०, रा. नशिराबाद) हिचे लग्न जानेवारी २०२४ मध्ये मुंबईतील शिवा दिनकर खरात यांच्याशी पारंपरिक पद्धतीने पार पडले होते. तक्रारीनुसार, लग्नानंतर अवघ्या काही आठवड्यांतच सासरच्या लोकांनी किरकोळ कारणांवरून शिवीगाळ करणे, मारहाण करणे आणि मानसिक त्रास देणे सुरू केले. या अविरत छळामुळे अखेर प्रियंका माहेरी परत आली.

तिने ९ मे रोजी दुपारी २ वाजता नशिराबाद पोलिस ठाण्यात आपली तक्रार नोंदवली. त्यात पती शिवा दिनकर खरात, सासरे दिनकर मारुती खरात, सासू अनिता खरात, चुलत जेठ रमेश खरात, मोठी सासू कलाबाई खरात, ननंद जयाबाई जाधव, लक्ष्मी अंभोरेज्योती वाघमारे (सर्व रा. मुंबई) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल फकीरा रंधे करत आहेत. पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर या प्रकरणात लवकरच कारवाई होण्याची शक्यता आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या