BHUSAWAL NEWS : भुसावळ शहरातील शांती नगर परिसरात घडलेल्या एका गंभीर प्रकारात, २१ वर्षीय तरुणीचा सहा महिन्यांपासून पाठलाग करणाऱ्या दर्शन अनंत चिंचोले (रा. भुसावळ) याच्यावर पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.
भाग्यवेद क्लासेस येथे शिक्षण घेणारी संबंधित युवती गेल्या काही महिन्यांपासून दर्शनच्या त्रासाला कंटाळली होती. आरोपीने तिला सतत प्रेमसंबंध ठेवण्याचा व लग्न करण्याचा दबाव टाकला. परंतु पीडितेने यास नकार दिल्यानंतर, चिंचोले याने तिचा पाठलाग सुरू ठेवत सार्वजनिक ठिकाणी तिचा हात पकडला आणि आत्महत्या करून तिला अडचणीत टाकण्याची धमकी दिली.
या संपूर्ण प्रकारामुळे युवतीला मानसिक त्रास सहन करावा लागला. अखेर तिने या प्रकरणाची तक्रार पोलिसांत नोंदवली. तक्रारीनंतर भुसावळ शहर पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपीविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 354 (विनयभंग), 354(D) (पाठलाग) व अन्य संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली असून, महिलांच्या सुरक्षिततेबाबत पुन्हा एकदा चिंता व्यक्त केली जात आहे. पोलिसांनी या प्रकरणाची अधिक चौकशी सुरू केली असून, लवकरच आरोपीला अटक करण्यात येईल, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
0 टिप्पण्या