भुसावळ | प्रतिनिधी - येथील औष्णिक वीज केंद्रातील वर्ग-२ अभियंत्याने सादर केलेल्या दिव्यांगत्वाच्या कथित प्रमाणपत्राबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. विधान परिषदेचे सदस्य एकनाथ खडसे यांनी केलेल्या तक्रारीनंतर संबंधित प्रकरणाची चौकशी करण्यात आली. चौकशीत सादर करण्यात आलेले कथित अपंगत्व प्रमाणपत्र, तपासणी अहवाल आणि अधिकृत स्वाक्षरीबाबत गंभीर विसंगती आढळल्याचा दावा करण्यात आला आहे.
चौकशी अहवालानुसार, संबंधित अभियंता श्रवणदोष तपासणीसाठी संस्थेत दाखल झाला होता. मात्र प्राथमिक चाचणीनंतर पुढील वैद्यकीय तपासणीसाठी बोलावूनही तो उपस्थित राहिला नसल्याची नोंद आहे. त्यामुळे तपासणी प्रक्रिया पूर्ण झालेली नव्हती.
जळगाव जिल्ह्यातील माहिती आणि न्यूज थेट आपल्या व्हाट्सअपवर लिंक वर क्लिक करा
तक्रारीनंतर संस्थेने संबंधित नावाने सादर करण्यात आलेले पत्र, कथित तपासणी अहवाल आणि संचालकांच्या नावाची स्वाक्षरी अधिकृत नसल्याचे स्पष्ट केल्याचा दावा करण्यात आला आहे.
दरम्यान, एकनाथ खडसे यांनी संबंधित कागदपत्रांची सखोल चौकशी करून जबाबदार व्यक्तींवर फौजदारी कारवाई करण्याची मागणी केली आहे.
टीप: या प्रकरणात चौकशी सुरू असून संबंधित व्यक्तीची बाजू अद्याप सार्वजनिकरीत्या समोर आलेली नाही. अंतिम निष्कर्ष संबंधित तपास आणि कायदेशीर प्रक्रियेनंतरच स्पष्ट होईल.

0 टिप्पण्या