साकळी महसूल मंडळाचे गस्ती पथक मंडळ अधिकारी सचिन जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली शुक्रवारी नियमित गस्तीस होते. गस्तीवर असलेले महसूल सेवक गणेश महाजन (साकळी), विजय भालेराव (मनवेल), आणि विकास सोळंके (न्हावी, प्र.अडावद) यांना वाळूने भरलेले ट्रॅक्टर (एम.एच. १९ बीजी ३४९५) संशयास्पदरीत्या जाताना दिसले.
तेव्हा त्यांनी तातडीने पाठलाग करत ट्रॅक्टर थांबवले. तपासणी दरम्यान ट्रॅक्टर चालकाकडे वाळू वाहतुकीसाठी आवश्यक कोणतेही वैध कागदपत्र अथवा परवाना नसल्याचे स्पष्ट झाले. घटनास्थळी पंचनामा करून ट्रॅक्टर तहसील कार्यालयात जमा करण्यात आला.
याप्रकरणी यावलच्या तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांच्या वतीने संबंधित ट्रॅक्टर मालकास दंडात्मक नोटीस बजावण्यात आली आहे.
🔍 अवैध वाळू वाहतुकीविरोधात महसूल विभागाचे पथक सक्रिय
महसूल विभागाच्या गस्ती पथकांनी अशा प्रकारच्या कारवायांना वेग दिला असून, अवैध वाळू उपशावर व वाहतुकीवर लक्ष ठेवण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.
0 टिप्पण्या