Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

BHUSAWAL CRIME : कुन्हे पानाचे येथे महिलेशी गैरवर्तन; दोन जणांविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

जुन्या वादातून महिला मारहाण प्रकरण; तालुका पोलिसांत गुन्हा दाखल


BHUSAWAL CRIME NEWS : भुसावळ – तालुक्यातील कुन्हे पानाचे येथे ३२ वर्षीय महिलेसोबत सार्वजनिक ठिकाणी गैरवर्तन, शिवीगाळ आणि मारहाण केल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी दोन व्यक्तींविरुद्ध भुसावळ तालुका पोलिस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, सुपडू पुंजू भोई आणि दीपक सुपडू भोई (दोघेही रा. कुन्हे पानाचे) यांनी यापूर्वी केलेल्या तक्रारीचा राग मनात ठेवून ९ मे रोजी सकाळी १० वाजता भुसावळ रोडवरील सार्वजनिक ठिकाणी तिच्याशी वाद घातला. दोघांनी तिला शिवीगाळ केली, मारहाण केली आणि विनयभंग केला.

या प्रकारामुळे महिलेची मानहानी झाली असून परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. पीडित महिलेने धैर्य दाखवत थेट पोलिस ठाण्यात धाव घेतली आणि आरोपींविरुद्ध कठोर कारवाईची मागणी केली.

भुसावळ तालुका पोलिसांनी दोघांविरुद्ध भारतीय दंड विधानातील संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणाचा तपास हवालदार नितीन चौधरी करीत आहेत.

महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने अशा प्रकारांना प्रतिबंध करण्यासाठी पोलिस प्रशासनाने तत्काळ आणि कठोर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या