![]() |
हज यात्रेच्या नावाखाली फसवणूक; शिक्षकाला तीन महिन्यांची शिक्षा |
HAJJ Fraud NEWS भुसावळ – हज यात्रेसाठी घेऊन जातो असे सांगून तब्बल ९ लाख ६० हजार रुपयांची फसवणूक करणाऱ्या शिक्षकाला भुसावळ येथील न्यायालयाने दोषी ठरवत तीन महिन्यांची कारावासाची शिक्षा आणि ४ लाख २५ हजार रुपयांचा दंड सुनावला आहे. दंड न भरल्यास एक महिन्याची अतिरिक्त शिक्षा भोगावी लागणार आहे.
या प्रकरणातील आरोपी इम्तियाज खान जफर खान (रा. बाबूजीपुरा, यावल, जि. जळगाव) हा चोपडा येथे शिक्षक म्हणून कार्यरत आहे. मोहंमद आसिफ शेख इस्माईल या फिर्यादीने दिलेल्या माहितीनुसार, २०१८-१९ मध्ये त्यांच्या कुटुंबातील चार सदस्यांची हज यात्रेसाठी तयारी सुरू होती. आरोपीने त्यांना यात्रेसाठी घेऊन जाण्याचे आमिष दाखवून एकूण ९.६० लाख रुपये घेतले.
यात्रा घडवून आणली गेली नाही आणि पैशांची परतफेडही केली नाही. आरोपीने यासंदर्भात हमीपत्र दिले होते आणि फिर्यादीच्या नावे दोन धनादेश दिले होते. मात्र, हे धनादेश बँकेत वटले नाहीत. यामुळे फिर्यादीने कायदेशीर नोटीस पाठवून भुसावळ न्यायालयात फौजदारी खटला दाखल केला.
या प्रकरणात न्यायालयाने आरोपीस निगोशिएबल इन्स्ट्रूमेंट ॲक्टच्या कलम १३८ अंतर्गत दोषी ठरवत शिक्षा सुनावली. फिर्यादीकडून ॲड. ए. एम. मलिक यांनी काम पाहिले असून, त्यांना ॲड. उजेर मलिक यांनी सहाय्य केले.
0 टिप्पण्या