Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

Bhusawal : रेल्वे स्थानकाबाहेर पार्किंग ठेकेदाराची दादागिरी; चालकाला मारहाण, धमकी



भुसावळ – भुसावळ रेल्वे स्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ पार्किंग ठेकेदारांच्या दादागिरीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पिंपळगाव हरेश्वर (ता. पाचोरा) येथील चालक योगेश शंकर पाटील (वय ३७) यांनी या प्रकरणी बाजारपेठ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

७ मे रोजी सकाळी १० वाजता पाटील हे आपल्या नातेवाइकांना सोडण्यासाठी क्रूझर गाडीने रेल्वे स्थानकाबाहेर आले होते. वाहन चालू स्थितीत ठेवून ते नातेवाइकांना उतरवत असताना, पार्किंग ठेकेदार कृष्णा परदेशी व त्याचे दोन साथीदार आले आणि पार्किंगचे पैसे मागू लागले. पाटील यांनी वाहन पार्क केले नसल्याचे स्पष्ट केले, तरीही ठेकेदारांनी त्यांच्याशी वाद घालत मारहाण केली आणि शिवीगाळ करत हातपाय तोडण्याची धमकी दिली.

या प्रकारामुळे रेल्वे स्टेशन परिसरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी बाजारपेठ पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. पाटील यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे ठेकेदारांविरोधात गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

दरम्यान, भुसावळ रेल्वे स्थानक परिसरात पार्किंग ठेकेदारांकडून होत असलेल्या मनमानी कारभारामुळे प्रवासी आणि वाहनचालक त्रस्त आहेत. अनेक वेळा ठेकेदारांचे कर्मचारी अर्वाच्य भाषेत बोलतात आणि दबाव टाकून पैसे वसूल करतात, अशीही ओरड आहे. स्थानक प्रशासन व पोलिसांनी या प्रकारांकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.







टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या