या वेळी बोलताना मुफ्ती हारुण नदवी यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, "सन १९९५ मध्ये वक्फ कायद्यात झालेली दुरुस्ती आम्हाला मान्य आहे. पण, २०२५ मधील नव्या सुधारणा आम्हाला मान्य नाहीत. वक्फ मालमत्ता आणि वक्फ बोर्ड सांभाळण्यासाठी मुस्लिम समाज स्वतः सक्षम आहे. हे नवीन बिल आमच्या धार्मिक स्वातंत्र्यावर आघात करणारे असून आम्ही कायदेशीर मार्गाने याविरोधात लढा उभारू. लोकशाही पद्धतीने आंदोलने, धरणे आणि उपोषण करीत हे बिल रद्द करण्यासाठी संघर्ष करू."
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मरकज मशिदचे मुतवल्ली हाजी अब्दुल मजीद बेपारी यांनी भूषवले होते. यावेळी फारुख शेख (जळगाव), डॉ. अ. करीम सालार, हाफिज उमेर नदवी, अयाज अली, अतिक अहमद हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
फारुख शेख यांनी २०२५ मधील वक्फ सुधारणा विधेयक हे कायद्याच्या दृष्टीने असंवैधानिक असल्याचे मुद्देसूद विश्लेषण केले. डॉ. अ. करीम सालार यांनी या विधेयकामुळे मुस्लिम समाजाच्या धार्मिक स्वातंत्र्यावर गदा येत असल्याचे स्पष्ट केले.
या बैठकीस मुस्लिम समाजातील नागरिकांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती. बैठकीत समाजाच्या एकतेचा सूर उमटला आणि सर्वांनी सरकारच्या विरोधात शांततामय पण ठाम संघर्ष उभारण्याचा निर्धार व्यक्त केला.
#WaqfLaw #MuslimCommunity #DastoorBachao #WaqfAmendmentBill #Muktainagar #AIMPLB #MuftiHaroonNadvi #ReligiousFreedom #NationwideProtest
0 टिप्पण्या