Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

"रोहयोतून मिळणार फळबाग अनुदान! ८ हजार हेक्टरसाठी नियोजन, १००% सहाय्य"



JALGAON NEWS जळगाव | शेतकऱ्यांना रोजगार व आर्थिक उत्पन्न मिळावे यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या (रोहयो) माध्यमातून आता फळबाग व फुलशेतीस प्रोत्साहन दिले जात आहे. २०२५-२६ या वर्षासाठी ८,००० हेक्टर क्षेत्रावर फळबाग लागवडीचे नियोजन करण्यात आले आहे, अशी माहिती विभागीय कृषी सहसंचालक सुभाष काटकर यांनी दिली.

२०२४-२५ मध्ये नाशिक विभागातील ९६२१ शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घेतला असून ८५९४.८९ हेक्टरवर फळबाग लागवड झाली आहे. राज्य शासनानेही मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवडीचा कार्यक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे.

योजनेअंतर्गत तीन वर्षांपर्यंत १००% अनुदान दिले जाते. लाभार्थ्यांमध्ये अनुसूचित जाती-जमाती, भटक्या-विमुक्त जमाती, दारिद्ररेषेखालील कुटुंब, स्त्री किंवा दिव्यांग कुटुंबप्रमुख, कर्जमाफ लाभार्थी, अल्प व सीमांत शेतकरी, वनहक्क कायद्यांतर्गत पात्र व्यक्ती यांचा समावेश आहे.

लागवडीसाठी उपलब्ध फळे व फुले:
आंबा, डाळिंब, संत्रा, मोसंबी, ड्रॅगन फ्रुट, द्राक्ष, अंजीर, सीताफळ, नारळ, काजू, पेरू, आवळा इत्यादी. याशिवाय साग, करंज, शेवगा, महोगणी, रबर, औषधी वनस्पती व मसालापिकेही करता येतील.
फुलशेतीसाठी: निशिगंध, मोगरा, गुलाब, सोनचाफा यांसारख्या फुलपिकांना एका वर्षात १००% अनुदान मिळते.

लाभ घेण्यासाठी अटी:
लाभार्थ्याकडे स्वतःच्या नावावर जमीन असणे आवश्यक असून तो जॉबकार्ड धारक असावा. कोणतीही एक अट पूर्ण करणारा लाभार्थी २ हेक्टरपर्यंत क्षेत्रावर लाभ घेऊ शकतो.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या