Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

भुसावळ : गंभीर इस्केमिक स्ट्रोकने त्रस्त वैभव पाटील यांच्यासाठी तातडीने मदतीची गरज; उपचार खर्चासाठी ₹10 लाखांचा निधी आवश्यक


पुणे -
 मूळचा भुसावळचा 24 वर्षीय वैभव पाटील, जो शिक्षणासाठी पुण्यात आला होता, सध्या गंभीर इस्केमिक स्ट्रोकशी झुंज देत आहे. ताणतणावामुळे अचानक तब्येत खालावली आणि त्याला तातडीने सह्याद्री सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, डेक्कन जिमखाना येथे दाखल करण्यात आले. सध्या तो ICU मध्ये अतिदक्षता विभागात जीवनासाठी झुंज देत आहे.

त्याच्या उपचारांसाठी हॉस्पिटलने सादर केलेल्या प्राथमिक अंदाजपत्रकानुसार एकूण खर्च सुमारे ₹13,42,983 इतका येणार आहे. त्यात बेड चार्जेस, डॉक्टरांचे शुल्क, सर्जिकल उपकरणे, फिजिओथेरपी, औषधे, रक्तपेढी शुल्क व इतर आवश्यक सेवांचा समावेश आहे. मात्र, पुढील औषधोपचार, चाचण्या, पुनर्वसन व फॉलोअपसाठी एकूण खर्च ₹10 लाखांपेक्षा जास्त होण्याची शक्यता आहे.

वैभवचे कुटुंब अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत जीवन जगत आहे. आई-वडील मजुरी करून उदरनिर्वाह करतात. घरात दुसरा कुठलाही कमावता नाही. अशा परिस्थितीत एवढा मोठा खर्च उचलणे त्यांच्या आवाक्याबाहेरचे आहे.

वैभवचे बंधू उमेश कुरकुरे यांनी जनतेला भावनिक आवाहन केले आहे:
“वैभव हे आमचं सर्वस्व आहे. आम्ही शक्य तितक्या मार्गांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न करत आहोत. पण खर्च अतोनात आहे. कृपया तुमच्याजवळून शक्य तितकी मदत करा – ₹1 सुद्धा खूप महत्त्वाचा ठरेल. तुमच्या छोट्याशा योगदानामुळे एक जीव वाचू शकतो.”

कृपया पुढे या, मदतीचा हात द्या आणि या तरुणाचे आयुष्य वाचवण्यासाठी आपली भूमिका बजावा.

➡️ मदतीसाठी संपर्क:
📞 9657850647 – उमेश कुरकुरे

तुमच्या प्रार्थना आणि मदतीबद्दल कुटुंब अत्यंत ऋणी राहील.

Donation link: https://www.impactguru.com/fundraiser/help-vaibhav-sunil-patil


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या