![]() |
महागाईत दिलासा! सामूहिक विवाहात २२ जोडपी विवाहबंधनात अडकली |
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगरसेवक जाफर शेख होते. त्यांनी सध्याच्या महागाईच्या काळात विवाह सोहळ्यांवरील अनावश्यक खर्च टाळून सामूहिक विवाह हे समाजासाठी गरजेचे असल्याचे सांगितले. अशा उपक्रमांमुळे सामान्य कुटुंबांवरील आर्थिक बोजा कमी होतो आणि समाजात ऐक्य वाढतो, असे त्यांनी नमूद केले.
या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून हाजी सईद बागवान उपस्थित होते. त्यांनी सामूहिक विवाह म्हणजे सामाजिक बांधिलकीचे उदाहरण असल्याचे सांगत, इस्लामची खरी शिकवण म्हणजे एकमेकांच्या सुख-दुःखात सहभागी होणे, असे मत व्यक्त केले.
निकाह विधी मौलाना शब्बीर साहेब यांनी पार पाडले आणि सर्व नवविवाहित जोडप्यांच्या सुखद वैवाहिक जीवनासाठी विशेष दुवा केली. मौलाना शकील यांनी विवाहाचे महत्त्व समजावून सांगत, प्रेम आणि विश्वास हे पवित्र बंधनाचे मूळ असल्याचे स्पष्ट केले.
कार्यक्रमात सहभागी झालेल्या २२ नवविवाहित जोडप्यांना गृहपयोगी २१ वस्तू भेट म्हणून देण्यात आल्या. या उपक्रमात करीम सालार, एजाज मलिक, अस्लम शेख यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.
0 टिप्पण्या