Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

JALGAON NEWS रायपूरमधील २७ वर्षीय विवाहिता बेपत्ता; MIDC पोलीस ठाण्यात नोंद


जळगाव – रायपूर येथील २७ वर्षीय मोनिका विकास चौधरी ही महिला शनिवारी रात्रीपासून बेपत्ता झाली आहे. पती विकास संतोष चौधरी यांच्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलिस ठाण्यात हरवल्याची नोंद करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास मोनिका कोणालाही काही न सांगता अचानक घरातून निघून गेली. बेपत्ता होताना तिच्या अंगात लाल रंगाचा टॉप व चुळीदार पॅन्ट होती. तिची उंची सुमारे ५ फूट २ इंच आहे.

या प्रकरणी पुढील तपास पोलीस नाईक किरण पाटील हे करत आहेत. कोणीही या महिलेबाबत माहिती दिल्यास पोलिसांशी त्वरित संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या