बोदवड – येथील न.ह. रांका हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाने ‘मुख्यमंत्री माझी शाळा – सुंदर शाळा’ या शालेय शिक्षण विभागाच्या अभियानात सहभागी होत तालुक्यातील सर्व शाळांना मागे टाकून प्रथम क्रमांक पटकावला आहे. या यशाबद्दल शाळेला सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र आणि तीन लाख रुपयांचे रोख पारितोषिक मिळाले आहे.
बोदवड येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित बक्षीस वितरण समारंभात आमदार चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली हा पुरस्कार शाळेला प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमात तालुक्यातील विजयी शाळांचा गौरव करण्यात आला.
पुरस्कार स्वीकारताना न.ह. रांका विद्यालयाचे चेअरमन मिठूलाल अग्रवाल, उपाध्यक्ष अजय जैन, सचिव विकास कोटेचा, संचालक श्रीराम बडगुजर, आनंद जैस्वाल, रवींद्र माटे, मुख्याध्यापक पी.एम. पाटील, उपमुख्याध्यापिका, उपप्राचार्य, पर्यवेक्षक आणि शिक्षकवृंद उपस्थित होते.
कार्यक्रमात आमदार पाटील यांनी शाळेच्या सातत्यपूर्ण गुणवत्तेचे व विकास कार्याचे कौतुक करत विद्यालयाचे अभिनंदन केले. त्यांनी सांगितले की, अशा उपक्रमांमुळे शाळांमध्ये स्पर्धात्मकता निर्माण होते आणि गुणवत्तेचा विकास साधला जातो.
या यशामुळे बोदवड तालुक्यातील न.ह. रांका हायस्कूलचे शैक्षणिक कार्य अधिक उजळले असून, हा पुरस्कार शाळेच्या प्रगतीचा आणि गुणवत्ता जपण्याचा ठसा आहे.
0 टिप्पण्या